गुजरात राज्याचा अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमधील 19 विद्यार्थ्यांची निवड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : समग्र शिक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या 6 वी ते 8 वी च्या वर्गातील शाळासिद्धीमध्ये गुणानुक्रमे प्रथम असलेल्या 19 शाळांमधील प्रथम आलेल्या 19 विद्यार्थ्यांची निवड करणेत आली आहे. हे विद्यार्थी आज गुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. २४ ते २९ असा हा अभ्यास दौरा राहणार आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान 2022- 23 या उपक्रमा अंतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी ज्या शाळा सर्वात प्रगत झालेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम आहे. अशा शाळांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि बक्षीस देण्यासाठी गुजरात राज्याचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमधील सहावी ते आठवी वर्गांमधील 19 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!