2 एप्रिल रोजी मोफत मार्गदर्शन, युनिक अकॅडमी कणकवली येथे सकाळी 11 वा
व एस आर एम कॉलेज,कुडाळ येथे दुपारी 3 वा.
विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
कुडाळ व कणकवली दोन्ही ठिकाणी होणार क्लास.35 दिवस , दररोज दोन तास शिकवणी
विविध स्पर्धा परीक्षांबद्दल अधिकारी व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दहावी व बारावी च्या परीक्षा संपल्यावर नेमकं कोणतं करियर निवडायच? काय करायचं? या संभ्रावस्थेत असणारे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक यांना विविध स्पर्धा परीक्षांची करियर च्या महत्त्वाच्या टप्प्यावर माहिती करून घेणे अत्यंत गरजेचं आहे . विद्यार्थी कॉलेज ची डिग्री किंवा पदवी पूर्ण करत असतानाच एखाद्या स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदावर पोहोचू शकतात,या संदर्भात योग्य माहिती मिळावी यासाठी युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग च्या मार्फत ‘मोफत उन्हाळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर’ 2 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे . या मोफत मार्गदर्शनाबरोबरच 35 ते 40 दिवसाच्या नियमित शिकवणी मध्ये सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती आणि त्याप्रमाणे अभ्यासक्रमाची ओळख व सर्व घटकांवर आधारित शिकवणी, तसेच यशस्वी अधिकारी विद्यार्थ्यांचे आणि सेवेत असणारे अधिकारी वर्ग यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या शिबिरामध्ये तज्ञ शिक्षक , नोटस, आय ए एस , आयपीएस, तहसीलदार यांच्या बरोबर अभ्यास दौरा सुद्धा आयोजित केला जाणार आहे. युनिक चे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून विविध सरकारी खात्यात काम करत आहेत,त्याचप्रमाणे इतर विद्यार्थी नियमित अभ्यास करत आहेत.
तरी जिल्ह्यातील 10 वी व 12 वी परीक्षा दिलेले आणि पास असलेल्या विदयार्थ्यांनी 2 एप्रिल 2023 रोजी युनिक कणकवली येथे सकाळी 11 वा आणि कुडाळ एस आर एम कॉलेज येथे दुपारी 3 वा. उपस्थित राहून माहिती घ्यावी असे आवाहन युनिक च्या वतीने करण्यात आलेलं आहे. अधिक माहितीसाठी 9689414974/9960658458 या नंबरवर संपर्क साधावा.












