आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी निवड

राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी केली नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी) : माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये असताना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची जबाबदारी होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिपद डावलल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षातील मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. रविंद्र चव्हाण हेच पुढील भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील, असे सांगितले जात होते. शिर्डीतील अधिवेशनात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असेही बोलले जात होते. मात्र तूर्तास त्यांच्याकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मार्चमध्ये भाजपाध्यक्षपदाची निवड होणार असल्याचे सांगण्यात येते.

भाजप पक्षसंघटनेत यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपद असे पद अस्तित्वात नव्हते. रविंद्र चव्हाण यांना याआधी संघटनात्मक बांधणीचे काम देऊन संघटन प्रभारी केले होते. यानंतर आता कार्यकारी अध्यक्षपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार असल्याची माहिती आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण हे जबाबदारी सांभाळणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. लवकरच चव्हाण बावनकुळे यांच्याकडून जबाबदारी स्विकारतील. सन २०२२ मध्ये बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तीन वर्षासाठी ही नियुक्ती केली जाते

error: Content is protected !!