धामापूरच्या पर्यटनात कर्ली नदितील बोटींग सेवेची भर

स्थानिक तरुणांचा रोजगार निर्मितीचा प्रयत्न


चौके (प्रतिनिधी): जगप्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ तथा वर्ल्ड हेरीटेज साईट चा दर्जा प्राप्त झालेले धामापूर गाव लाखो पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे पर्यटन स्थळ बनले आहे. काही कारणास्तव धामापूर तलावामध्ये सुरू असलेली बोटींग सुविधा सध्या बंद असल्याने. बोटींगच्या उद्देशाने येणाऱ्या पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन धामापूर गावातील स्थानिक तरुण आनंद उर्फ बाबू तोरसकर , आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्ली नदिपात्रात बोटींग करण्यासाठी सुसज्ज अशी बोट पर्यटकांच्या सेवेत दाखल केली आहे. याच्या माध्यमातून गावातील तरुणांना वेगवेगळ्या प्रकारे रोजगार उपलब्ध होणार आहेत.
सदर बोटींग सेवेचा शुभारंभ धामापूर सरपंच सौ. मानसी परब यांच्या हस्ते २२ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी उपसरपंच रमेश निवतकर , आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर , उपसरपंच रविंद्र परब , उद्योजक महेश परब , प्रा. महेश धामापूरकर , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी , मेरीटाइम बोर्डाचे सहाय्यक बंदर निरीक्षक सुहास गुरव ,माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब , योगेश राऊळ , माजी सरपंच ज्ञानेश्वर परब , शशिकांत गावडे , संदिप पावसकर , अशोक थवी , प्रताप चव्हाण, अभी भोसले, प्रशांत गावडे , आरोग्य सेवक गणेश जाधव , रविंद्र कदम आणि इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा आनंद ( बाबू) तोरसकर यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सरपंच सौ. मानसी परब यांच्या हस्ते फित कापून आणि प्रा. महेश धामापूरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पर्यटक बोटींग सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!