कुडाळ(प्रतिनिधी) : दिनांक 24 मार्च रोजी डायमंड हॉल,माजगाव,ता.सावंतवाडी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडी तर्फे आयोजित महिला मेळावा घेण्यात आला..सदर मेळाव्यात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष या निमित्ताने विविध पौष्टिक आहार प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनातून प्रथम , द्वितीय, व तृतीय क्रमांक काढण्यात आले.तसेच उत्तेजनार्थ बक्षीस व प्रदर्शनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व महिलांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक डॉ.रुपेश पाटकर यांनी पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले.श्रीमती अर्पिता वाटवे यांनी महिलांचे कायदे या विषयावर मार्गदर्शन केले तसेच श्रीमती रूपाली प्रभू यांनी कौटुंबिक हिंसाचारपासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 यावरती महिलांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास माजगाव ग्रा.प.सदस्य श्री.संजय कानसे सर,श्री धुरी सर,श्रीमती माजगावकर मॅडम,श्रीमती दळवी तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती संध्या मोरे मॅडम,पर्यवेक्षीका श्रीमती आर्या देऊलकर मॅडम,पवार मॅडम ,सहाय्यक संरक्षण अधिकारी श्रीमती श्वेता बगळे,श्री.रोहन सैदाणे आदी मान्यवर उपस्थित होते. बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती मोरे मॅडम यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका श्रीमती निबरे यांनी केले आभार प्रदर्शन श्रीमती मोरे मॅडम यांनी केले.














