आग विझवताना होरपळून वृद्धाचा मृत्यू ; हरकुळ ( बु.) येथील घटना

कणकवली (प्रतिनिधी) : घराच्या कंपाउंड बाहेर लागलेली आग विझवताना श्रीकृष्ण वसंत प्रभूपाटकर ( वय 70, रा. जंगमवाडी, हरकुळ बुद्रुक ) या वृद्धाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना 14 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. श्रीकृष्ण प्रभूपाटकर यांच्या घराच्या कंपाउंड बाहेर आगीचा वणवा लागला होता. ही आग घराच्या कंपाउंड मध्ये येईल या भीतीने श्रीकृष्ण पाटकर हे आग विझवण्यासाठी घराच्या कंपाउंड बाहेर गेले. आगीने होरपळल्यानंतर श्रीकृष्ण हे घराच्या कंपाऊण्ड बाहेर पडले. ऍम्ब्युलन्स मधून श्रीकृष्ण याना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले असता ते मृत झाल्याचे घोषित केले. दुर्घटनेची माहिती समजताच हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

error: Content is protected !!