चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब गावचे रहिवासी तथा काळसे येथील शिवाजी विद्यामंदिर काळसे या हायस्कूल चे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक बापू संभाजी लाड यांचे बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी अल्पशा आजरानें गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातंवंडे असा परीवार आहे. काळसे हायस्कूलमधून 31 जुलै 2014 रोजी ते सेवानिवृत्त झाले होते. अतिशय शिस्तप्रिय शिक्षक , व मनमिळाऊ व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर काळसे गावातही ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.












