कणकवली वाहतूक पोलिसांचा वाहतूक नियमभंग, ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना तब्बल 14 लाख 20 हजारांचा दणका

वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, कॉन्स्टेबल राजाराम पाटील यांची 1583 जणांवर दंडात्मक कारवाई

कणकवली (आनंद तांबे) : कणकवली पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलिसांनी सरत्या 2024 वर्षात वाहतूक नियमभंग आणि ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या एकूण 1 हजार 583 जणांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल 14 लाख 20 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या सूचनेनुसार डीवायएसपी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल राजाराम पाटील यांनी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान ही करवाई करत खाकी वर्दी चा धाक वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कायम ठेवला आहे. पोलीस वाहतूक शाखेकडून वेळोवेळी वाहतूक नियमभंग, ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत वाहनचालकांचे प्रबोधन केले जाते. मात्र तरीही वाहतूक नियमभंग करत आणि ड्रंक अँड ड्राइव्ह करत वाहनचालक स्वतःसोबत इतरांचाही जीव धोक्यात आणतात. अशा मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या आणि ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानुसार डीवायएसपी घनश्याम आढाव, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, कॉन्स्टेबल राजाराम पाटील यांनी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान मोटरवाहन कायदाभंगच्या एकूण 1 हजार 579 कारवाई करत 13 लाख 79 हजार 200 आणि ड्रंक अँड ड्राइव्हच्या 41 कारवाईसह 41 हजार दंड अशी एकूण 1 हजार 583 जणांवर 14 लाख 20 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. सन 2024 कॅलेंडर इअर मध्ये तब्बल 1584 जणांवर कारवाईचा बडगा उचलत 14 लाख 20 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याबद्दल हवालदार विनोद चव्हाण, कॉन्स्टेबल राजाराम पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!