म.रा.प्राथ.शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२५ चा शुभारंभ जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.

तळेरे प्रभागातील खारेपाटण व शेर्पे या दोन केंद्रातील इयत्ता ५ वी व ८ वी च्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यासाठी खारेपाटण जि.प. केंद्र शाळा नं.१ येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे केंद्र घेण्यात आले होते.यावेळी म.रा. प्राथ.शिक्षक समितीचे राज्यस्तरीय संघटनेचे प्रतिनिधी मंगेश मुद्रस खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, केंद्रशाळेचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रवणकर, नडगिवे नं.१ शाळेचे शिक्षक संदीप कदम, केंद्र शाळा शेर्पे चे शिक्षक तुषार तांबे, कुरंगवणे जि.प.शाळेचे शिक्षक राजू गर्जे, शिडवणे नं.१ शाळेचे शिक्षक दीपक काळेल,चिंचवली येथील जि.प.शाळेचे पालक दत्तात्रय भालेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी शिक्षक समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी चागले काम करत असल्याबद्दल आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. तर शाळेच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांनी देखील शुभेछा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले. तर शेवटी आभार शाळेच्या शिक्षिका राऊत मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!