वैभववाडीत पेट्रोल पंपाच्या कंपाऊंड मध्ये आढळून आला अज्ञात तरुणाचा मृतदेह

वैभववाडी शहरात उडाली खळबळ

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारपेठेतील वैभव लक्ष्मी पेट्रोल पंपाच्या कंपाऊंड मध्ये सुमारे ३० ते ३५ वर्षाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला आहे. त्यामुळे वैभववाडी शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पेट्रोल पंपाच्या मालक स्नेहल संतोष रावराणे वय ५५ रा. माईणकरवाडी यांनी वैभववाडी पोलीस स्थानकात खबर दिली आहे. तरुणाच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

वैभव लक्ष्मी पेट्रोल पंप च्या मालक स्नेहल रावराणे  या नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी ७. १५ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपच्या आवारात फिरताना पेट्रोल पंपाच्या पूर्वेच्या दिशेच्या भिंती नजनी एक अज्ञात तरुण पडलेल्या अवस्थेत दिसून आला त्यांनी पुढे जाऊन त्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाणे येथे माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल,पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पडवळ, हरित जायभाय, जितेंद्र कोणते, अभिजीत तावडे, अजय बिलपे, समीर तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहावरील जखमा, व्रण व मृतदेहाची झालेली छिन्नविच्छीन अवस्था पाहता त्याच्या अंगावरून एखादे वाहन गेले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाच्या अंगावर निळसर रंगाचा टी-शर्ट व निळसर रंगाची फुल पॅन्ट होती. मात्र त्याची ओळख पटेल असा कोणतीही वस्तू अथवा कागदपत्र त्याच्याजवळ आढळून आली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्याने अंगात घातलेला टी-शर्टवर गजबादेवी असे लिहिलेले आहे. त्यावरून पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत त्याची ओळख पटू शकली नाही. सदर इसमाचा अज्ञात वाहनाने टायर खाली चिरडून त्याचे मृत्यूस कारणीभूत व कोणास काही न सांगता निघून गेल्या प्रकरणी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल करीत आहेत.

error: Content is protected !!