कोकिसरे गुरववाडी येथील लक्ष्मण यशवंत गुरव आहे मृत तरुण
वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे गुरववाडी असे त्या मयताचे नाव आहे. तो अविवाहित होता. शुक्रवारी सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र त्याच्या अंगावरून कोणते वाहन कसे गेले याचा तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.गुरुवारी सकाळी शहरातील वैभववाडी पोलीस ठाणे समोरील पेट्रोल पंपाच्या आवरत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे वैभववाडी शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी सांगितले. त्याचा मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला होता.
दरम्यान कोकिसरे येथील लक्ष्मण गुरव हा तरुण बुधवारी सकाळपासून कोकिसरे गुरववाडी येथून गेला तो परत घरी आला नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. यापूर्वी सुद्धा तो अनेक वेळा चार आठ दिवस घरातून बेपत्ता झालेला होता.व परत घरी येत होता. शुक्रवारी सकाळी मयत लक्ष्मण गुरव याचा लहान धनंजय गुरव भाऊ याने प्रसार माध्यमातून अनोखी मृतदेह सापडल्याची बातमी वाचली. आपला भाऊ दोन दिवस घरी आलेला नसल्यामुळे त्यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत संपर्क साधला. वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात ठेवलेला मृतदेह दाखवला. मृतदेह पहिल्यानंतर तो आपल्या भावाचाच असल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार मयत लक्ष्मण गुरव हा आई सोबत कोकिसरे येथे राहात होता. तर वडिलांची तब्बेत बरी नसल्यामुळे उपचारासाठी ते मुंबई येथे आहेत. त्याचा लहान भाऊ धनंजय हा सोमवारी मुंबईवरून गावी आला आहे. ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर कोकिसरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृताची ओळख पटली असली तरी नेमका त्याचा मृत्यू कसा झाला. प्रथम दर्शनी त्याच्या अंगावरून मोठे वाहन गेल्याचे दिसून येत आहे. मात्र नेमके कोणते वाहन त्याच्या अंगावरून गेले. त्या वाहचालकाने याबाबत पोलिसांना का माहिती दिली नाही. असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ज्या पेट्रोल पंपाच्या आवारात मृतदेह सापडला तो पंप गेले काही महिने बंद आहे. मात्र रात्रीच्यावेळी काही ट्रक तिथे थांबतात. त्यासाठी पोलीस शहरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून पाहत असून गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापर्यंत तरळे वैभववाडी मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या अवजड वाहनांची माहिती संकलित करीत आहेत. त्यातून काही सुराग लागतो का पोलीस तपास करीत आहेत. त्याच्या अंगावर असलेले क्रिकेट टी शर्ट गजबादेवी असे लिहिलेले असून ते मिठबाव येथील तरुणाचे आहे. त्या तरुणाची बॅग चार महिन्यापूर्वी मुंबई येथून चोरीस गेली होती. त्या बॅग मध्ये ते टी शर्ट होते. अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.ते टी शर्ट मयताकडे कसे आले. याची माहिती घेत आहेत.या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अवसरमोल करीत आहेत.











