कणकवली नगरपंचायत कंत्राटी पाणीपुरवठा कामगारांचे ठेकेदाराकडून आर्थिक शोषण

तात्काळ दखल न घेतल्यास प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन

सत्यशोधक कामगार संघटनेचे ऍड सुदीप कांबळे यांचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांचे संबंधित ठेकदारकडून आर्थिक शोषण होत आहे. शासन नियमानुसार दरमहा किमान13 हजार 500 रुपये पगार देने आवश्यक असतानाही केवळ 9 हजार देऊन प्रत्येक पाणीपुरवठा कर्मचाऱ्याची 4 हजार 500 रुपयांची फसवणूक ठेकेदार करत असल्याचा आरोप सत्यशोधक कामगार संघटनेचे ऍड सुदीप कांबळे यांनी केला आहे. याबाबत योग्य दखल घेत न्याय न दिल्यास प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी नगरपंचायत समोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड. सुदीप कांबळे यांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे. निवेदनात ऍड सुदीप कांबळे यांनी म्हटले आहे मी नगरपंचायत स्थापनेपासून सदर कर्मचारी पाणीपुरवठा विभागात मागील 20 वर्षे कार्यरत आहेत. शासन नियमानुसार कुशल कर्मचाऱ्यांना प्रतिमहा किमान वेतन 13 हजार 500 रुपये देने बंधनकारक आहे. शासन नियमानुसार काढलेली पाणीपुरवठा विभागाची निविदा असल्यास संबंधित निविदधारक ठेकेदाराने किमान वेतन देने बंधनकारक आहे. मात्र साडेतेरा हजार ऐवजी केवळ 9 हजार वेतन दिले जात आहे. हे कामगारांचे आर्थिक शोषण आहे. याची दखल घेत पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना साडेतेरा हजार वेतन दरमहा देण्याची अमंलबजावणी करावी. अन्यथा येत्या 26 जानेवारी रोजी कणकवली नगरपंचायत समोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड सुदीप कांबळे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!