खारेपाटण हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : “शालेय विद्यार्थ्यांनी शालेय दशेतच देशसेवेचे व आणि समाजसेवेचे व्रत अंगी बाणल्यास देशहितासाठी सुजाण नागरिक घडतील.” असे भावपूर्ण उदगार माजी सेवानिवृत्त भारतीय सैन्य दलाचे सैनिक व याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेले मेजर वासुदेव तुकाराम जंगम यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म विद्यालय व ज्युनियर कॉलेज आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स खारेपाटणच्या नुकत्याच संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्याला शाळेचे माजी ज्येष्ठ विद्यार्थी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक वासुदेव जंगम,प्रसिद्ध कवी व्याख्याते प्रा.संजय कमळकर,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,शाळेचे पहिले माजी विद्यार्थी अनंत पाटणकर, माजी विद्यार्थिनी गीता राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष महेश कोळसुलकर,संचालक दादा कर्ले,
राजेंद्र वरुणकर,संदेश धुमाळे, खारेपाटण महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,मोहन कावळे, विजय देसाई, प्रशांत गुळेकर,दिगंबर राऊत,गुरुप्रसाद शिंदे,योगेश गोडवे,सामजिक कार्यकर्ते नंदू कोरगावकर,मंगेश गुरव,संतोष पाटणकर,यांसह शाळेचे माजी शिक्षक अत्तार सर सेवानिवृत्त शिक्षक वर्ग व खारेपाटण हायस्कूलचे मुंबई,पुणे,गोवा व अन्य ठिकाणी बाहेरगावी असलेले माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
यावेळी बोलताना वासुदेव जंगम पुढे म्हणाले खारेपाटण हायस्कूलचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांची दुरदृष्टी एवढी प्रचंड होती की त्यांनी खारेपाटण सारख्या खेड्यात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून शिक्षणचे रोपटे लावले.आणि त्यांच्या शिस्तीतूनच आम्ही देशसेवे बरोबरच समाज सेवा शिकत घडलो.असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर ज्या शाळेने आपल्याला घडवले व मोठे केले त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या दातृत्व भावनेतून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व शाळेचे माजी विद्यार्थी तथा मिलिटरी रिटायर्ड जवान वासुदेव जंगम यांनी सुमारे १ लाख रुपये रकमेचा धनादेश खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांचेकडे सुपूर्द केला.या माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वरांगे यांनी केले तर आभार महादेव मोटे सर यांनी मानले.















