मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील आडबंदर येथील जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत गोंदापूर पोयरे संघाने काळभैरव हिंदळे संघाचा पराभव करत विजेतपद पटकावले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी सभापती तथा उद्योजक भाई पारकर, ग्रा. सदस्य धर्माजी आडकर, रविना मालडकर, निकिता कांदळगावकर, अध्यक्ष वामन आडकर, नारायण आडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मालिकावीर गुरुनाथ दुखंडे(गोंदापूर), उत्कृष्ट फलंदाज गुरुनाथ दुखंडे (गोंदापूर),
उत्कृष्ट गोलंदाज: समीर राणे (काळभैरव) तर शिस्तबद्ध संघ मेस्त्रीवाडी पोयरे यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम दोन क्रमांकाना अनुक्रमे दहा हजार, सात हजार रुपये व चषक देण्यात आला. पंच म्हणून राजन आडकर, शंकर आडकर, लक्ष्मीकांत आडकर, उदय आडकर यांनी काम पाहिले.
मुणगे क्रिकेट स्पर्धेत गोंदापूर पोयरे विजेता !










