“पालक शिक्षक आणि ग्रामस्थ एकत्र आल्यास आदर्श शाळा बनतात ” – सूर्यकांत चव्हाण
खारेपाटण (प्रतिनिधी) : “समाजातील पालक शिक्षक आणि ग्रामस्थ एकत्र आल्यास एक आदर्श शाळा कशी निर्माण होते.व याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाने मॉडेल स्कूल म्हणून मान्यता दिलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषदेची पूर्ण प्रथिमक मराठी केंद्र शाळा नं.१ होय.” असे भावपूर्ण उदगार फोंडाघाट केंद्राचे केंद्रप्रमुख सूर्यकांत चव्हाण यांनी खारेपाटण केंद्र शाळा येथे शेत्रभेटअभ्यास दौऱ्यात शिक्षकांना मार्गदर्शन करताना काढले.
कणकवली तालुक्यातील फोंडा केंद्रातील शिक्षक यांच्यावतीने नुकताच शेत्र भेट अभ्यास दौरा केंद्रप्रमुख सूर्यकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला होता.यावेळी खारेपाटण येथील मॉडेल स्कूल असलेल्या खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ला भेट देऊन शाळेच्या अभिलेख व्यवस्थापन व नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जाणून घेन्यात आली.यावेळी फोंडा केंद्रातील एकूण १० शाळांतील २२ शिक्षकांसह आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक विद्याधर तांबे यांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश होता.
खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी अभ्यास दौऱ्या निमित्त आलेल्या सर्व शिक्षकाचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शाळेच्या अंतरंग व बाह्य परिसराची तसेच असलेल्या भौतिक सोयी सुविधाची देखील पाहणी करन्यात आली. यावेळी पि पी टी द्वारे शाळेच्या संपूर्ण उपक्रमाची माहिती एल सी डी स्क्रीनवर उपस्थित शिक्षकांना देण्यात आली. खारेपाटण सारख्या एका सुंदर व आदर्श शाळेला भेट देऊन आम्ही समाधानी झालो असून खारेपाटण शाळा राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल असल्याची भावना यावेळी उपस्थित शिक्षकांनी वक्त केली. शेवटी सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका आरती जोजेन यांनी मानले.















