संजय नाईक सरांचे दूध डेअरीचे स्वप्न पूर्ण करणार – उद्योजक दत्ता सामंत

पेंडूर येथील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

देवस्थान ट्रस्ट व कै. संजय नाईक मित्र मंडळाचे आयोजन

चौके (अमोल गोसावी) : संजय नाईक सरांचं संघटन कौशल्य अवर्णनीय असं होत. कोणताही धार्मिक, सांस्कृतिक शैक्षणिक अथवा आरोग्य विषयक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यात संजय नाईक सर यांचा हातखंडा होता. स्वतः शिक्षक असूनही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असायचे. पेंडूर गावातील दूध डेअरी आणि व्यावसाईक कलिंगड शेती हे नाईक सरांच्या प्रयत्नाचे यश आहे. नाईक सरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प केल्यास त्यासाठी मी सर्वातोपरी सहकार्य करेन. संजय नाईक सर मित्रमंडळाने आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर घेऊन चांगले कार्य हाती घेतले आहे. याबरोबरच सरांचे विचार कायम राहण्यासाठी आपण विविध उपक्रम सातत्याने राबाविले पाहिजेत. ज्या ज्या वेळी पेंडूर गावचा उल्लेख येतो तेव्हा संजय नाईक सरांचं नाव आल्याशिवाय राहत नाही. नाईक सरांचा दुध डेअरीचा संकल्प मी पूर्ण करणार. यामुळे रोजगार निर्माण होऊन आपण पवित्र काम केल्याच पुण्य लाभेल. ” असे प्रतिपादन उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पेंडूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मांड उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर पेंडूर गावातील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिर नजीक देवस्थान ट्रस्ट व कै. संजय नाईक मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने 55 रक्तदात्यांनी रक्तदानाचे बहुमोल कार्य केले. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व ॲडव्होकेट रुपेश परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल, सचिव अमित कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते दीपा सावंत, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, ग्रा.प सदस्य वैष्णवी लाड, अमित पटेल, संदेश नाईक, प्रकाश सरमळकर, डॉ. सोमनाथ परब, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, अमित सावंत, गणेश वाईरकर, मंगेश माड्ये, अक्षय गावडे, सुरेश कांबळी, प्रदीप मीठबावकर, समीर रावले, प्रदीप सावंत, यश नाईक, गौरव नाईक, पिंट्या वालावलकर, पिंट्या परब, मनोज वायंगणकर, विजय बांदीवडेकर, आनंद परुळेकर, निलेश हडकर, आतिक शेख, आबा वारंग उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, ऍड. रुपेश परुळेकर, देवस्थान ट्रस्टचे सचिव अमित कुळकर्णी, ग्रा.प. सदस्या वैष्णवी लाड यांनी कै. संजय नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला या शिबिरास पडवे येथील एस एस पी एम मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे डॉ. गणेश पाटील, यांच्यासह वनिता जंगले, अक्षता केळकर, चेतन सावंत, साक्षी बालम, लावण्या हडकर, प्रीती सावंत यांचे सहकार्य लाभले. दरम्यान कै. संजय नाईक यांच्या पत्नी श्रावणी नाईक यांनी या रक्तदान शिबीरास भेट दिली आणि कै. संजय नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविलेल्या या कार्यक्रमाबद्दल देवस्थान ट्रस्ट, संजय नाईक मित्रमंडळ आणि सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ परब सूत्रसंचालन गौरव नाईक तर आभार सुमित सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!