देवस्थान ट्रस्टच्या वतीने लक्षदीपोत्सव सोहळ्याचे आयोजन
लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

चौके (अमोल गोसावी) : पेंडूर गावातील सुरू असलेल्या ऐतिहासिक मांड उत्सवा निमित्त आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी रात्रौ ९:३० वाजता देवस्थान विश्वस्त मंडळ, पाच बारा मानकरी गावकर मंडळी पेंडूर यांच्या वतीने लक्षदीपोत्सव सोहळ्याचे व फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज पेंडूर गावात हजारो भाविकांचा जनसागर लोटणार आहे. याबाबतचे नियोजनही पेंडूर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
याबरोबरच देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवामध्ये यावर्षी सामाजिक उपक्रमां बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये धनगर समाजाचे गजा नृत्य, कुडाळ कुंभारवाडा शाळेतील मुलांचे गोफन नृत्य, नेरूर सुतारवाडी येथील चित्र देखाव्यासहित आकर्षक मांड उत्सव, असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम देवस्थान ट्रस्टने आतापर्यंत राबविले आहेत. याबद्दल येथे येणाऱ्या भाविकांकडून देवस्थान ट्रस्टचे कौतुक होत आहे.










