इनोव्हाची मोटरसायकल ला धडक ; मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर तळेरेहुन कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या मोटरसायकल ला इनोव्हा कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार श्रीहरी विनोदन टी (२२, रा. कणकवली तेलीआळी) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवार 20 जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास तीवरे बेळणे फाटा येथे झाला. याप्रकरणी विनोद टी के कृष्ण यांच्या फिर्यादीवरून इनोव्हा कार चालक महेश धनंजय मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीहरी हा सोमवारी मित्राची दुचाकी घेऊन तळेरे येथे गेला होता. दुपारी तळेरे येथून कणकवलीच्या दिशेने येत होता. त्यावेळी तो तीवरे बेळणे फाटा येथे आला असता मिडलकटने कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारची दुचाकीची धडक बसली. या धडकेत श्रीहरी याला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी श्रीहरी याला उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!