मुख्यमंत्री साहेब आणि उद्योग मंत्री साहेब,कशाला जाता तुम्ही दावोसला

परदेशी लक्ष्मीची गुंतवणूक आली की आमच्या जिल्ह्यात, या आमच्याच ओरोसला – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : ४ अंश सेल्स च्या थंडी वाऱ्यात, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उद्योग मंत्री महोदय, हे महाराष्ट्र राज्यात,भविष्यात परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी स्विसदुर्गाला ला गेले आहेत.त्यांना आशा आहे, की परदेशी लक्ष्मी पुत्र, हे आपल्या महाराष्ट्र राज्यात, थेट गुंतवणूक आणतील आणि या राज्यात उद्योग धंद्याला चालना देतील.म्हंजे राज्याचे,दरडोई उत्पन्नही वाढेल .पण, या दाैऱ्याची दखल घेवून,परदेशी नागरिक एवढ्या वेगाने,सिंधुदुर्गातील,”लक्ष्मी” नगरीत येतील एवढे वाटले नव्हते.पण,ज्या प्रमाणे, या जिल्ह्यात रेती उपसा,जुगार,गौण खनिजे ह्यांना प्रशासनची कोणतीही सक्ती लागू नाही.त्याच प्रमाणे बांगला देशातील,लाडक्या हसिनाना, येथील अवैध्य धंदे करणाऱ्या “लक्ष्मी” पुत्रांना अवैद्य सेवा पुरविण्यासाठी,आपण ही जावे,असे वाटले का? अनेक अवैध्य धंदे मागील काही काळा पासून का निर्डावले गेले ?.हा प्रश्न आता, स्थानिक नागरिकांना उद्ध”भावे”ल,असे ही कधी वाटले नव्हते.,कदाचित येथील दरडोई उत्पन्न,याचा वाढता आकडा, हा नेहमी भाषणातून फुगवून सांगितला जातो.आणि परप्रांतियांचे मेळाव्यात,त्यांचे आदरयुक्त सत्कार केले जात आहेत.अधून मधून परप्रांतीय कलाकारांना सांस्कृतिक फेस्टिवल निमित्त या,हिंदूराष्ट्र जिल्ह्यात,भरमसाठ मानधन देवून आणले जात ही आहेत.त्यामुळे कदाचित,ह्या परदेशी मुली,या जिल्ह्यात आकर्षित झाल्या असतील का?..आता,दरडोई उत्पन्न प्रमाणे,या अवैद्य रित्या प्रवेश करून,भारतात घुसखोरी करून आलेल्या परदेशी सुकन्यांचे “पालकत्व” कोण घेणार आहे,का? या सिंधुदुर्गातील चालक,मालक, पालक ही सर्व हक्क घेतलेल्या सत्ताधीशाना,आणि इव्हीम मुळे,विरोधकच शिल्लक न राहिल्या मुळे, हे प्रश्न आता नागरिकांनी विचारण्याची ची वेळ आली आहे.आणि प्रशासनाला तर धारेवर धरले पाहिजे.नाहीतर, सिंधुदुर्ग जिथे महाराजांचा पुतळा धरातिर्थ पडला, तेथे संस्कृतीचा पुळका कोणाला असणार ?असा प्रश्न समस्त राज्यातील जनतेला पडला असेल, तेव्हा मा. मुख्यमंत्र्यांनी दावोस येथे न जाता,येथे ओरोसला यावे.आणि स्वतः जातीने लक्ष घालावे .

error: Content is protected !!