एलसीबी पथकाने शिताफीने केली अटक
देवगड (प्रतिनिधी) : कामावरून घरी परत जाणाऱ्या पादचारी तरूणीची पिशवी हिसकावून मोबाईल व रोकड लंपास करून आपल्या ताब्यातील मोटरसायकल तेथेच टाकून पळ काढणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ओरोस खर्येवाडी येथील बसस्टॉपजवळ २१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शिताफीने ताब्यात घेतले.सुर्यकांत अनंत चव्हाण (३९) रा. ओरोस खर्येवाडी असे संशयिताचे नाव असून चोरलेला मोबाईल व रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चोरीची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वा. सुमारास आचरा मुणगे घाटीरस्त्यावर घडली होती.










