आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत धालवली मुस्लिमवाडी रस्त्याचे भूमिपूजन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील धालवली गावातील मुख्य रस्ता ते मुस्लिमवाडी रस्ता डांबरीकरण कामाचा आज आ.नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत गावाच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.या रस्त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.धालवली मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांची रस्ता डांबरीकरणाची प्रलंबित मागणी पूर्ण होत असल्यामुळे स्थानिकांनी आमदार नितेश राणेंचे आभार मानले. यावेळी भाजप पदाधिकारी बाळा खडपे,भाजप तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली, बंड्या नारकर,इतर भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!