तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंदमेळा येथे ‘सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये (लहान गट 7 ते 12 वर्ष) या गटात कासार्डेच्या कु. सावी वैभव मुद्राळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 13 स्पर्धक सहभागी झाले होते. तीला तिचे आई-बाबांचे तसेच नृत्य दिग्दर्शक सॅड्रीक डिसोजा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून ती सॅड्रीक डिसोजा डान्स अकॅडमी तळेरेची विद्यार्थ्यिनी आहे.तीने यापुर्वीही अनेक नृत्य स्पर्धेत तसेच वेशभूषा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. कु. सावी मुद्राळे हिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.