अभ्यासाला हो म्हणाss कॉपीमुक्त होऊ याssss

फोंडा हायस्कूलमध्ये कॉपीमुक्त अभियानाला प्रारंभ !

अभियानांतर्गत हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट मधील मुला- मुलींच्या प्रभात फेरीतील “कॉपीमुक्त होऊ याss अभ्यासाला हो म्हणाssss” या घोषणांनी बाजारपेठ दुमदुमली. कोकण विभागीय प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेत होणाऱ्या कॉपीबद्दल जनजागृती करण्यासाठी, आठवडाभर ‘कॉपी मुक्त अभियान’ राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अभियानाचा शुभारंभ अजिंक्य पोपळे आणि भाग्येश कदम सर यांचे मार्गदर्शनाखाली, प्रभातफेरीने करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट मध्ये या अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, मार्गदर्शकांची भाषणे,घोषवाक्य स्पर्धा, शिक्षक- पालक- कर्मचारी संवाद इत्यादी सारखे लोकजागृती करणारे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या गंभीर विषयाबद्दल शिक्षक, विद्यार्थी वर्गात या उपक्रमामुळे समाधान व्यक्त होत आहे

error: Content is protected !!