27 लाखांच्या विकासकामांचे करण्यात आले भूमिपूजन
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील पडेल गावात विकासकामांचा धमाका सुरू केला असून एकाच दिवशी 27 लाखांच्या रस्ता डांबरीकरण नूतनीकरण कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आला.पडेल गावातील रस्त्यांसाठी डोंगरी विकास मधून 17 लाख तर 25 / 15 मधून 10 लाखांचा निधी प्राप्त करून दिला आहे.आमदार नितेश राणे यांनी पडेल तानवडेवाडी मुख्य रस्ता ते स्मशानभूमी मराठे घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणसाठी तब्बल 10 लाखांचा निधी, पडेल वारीकवाडी ते कुलस्वामिनी मंदिर रस्ता खडीकरण , डांबरीकरण, तिर्लोट मुख्य रस्ता ते हेमलेवाडी रस्ता डांबरीकरण साठी 17 लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर होण्यासाठी सरपंच भूषण पोकळे यांनी पाठपुरावा केला होता. या रस्त्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी, बाळ खडपे,भाजपा देवगड तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली, पडेल सरपंच भूषण पोकळे, बंड्या नारकर, रवी पाळेकर, रवींद्र तिर्लोटकर, गणेश राणे, माजी सभापती संजय बोंबडी, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस, अंकुश ठुकरुल, संजय मूळम, ग्रा पं सदस्य प्रभाकर वाडेकर, सिद्धेश्वर पाटणकर, समीर हेमले, शरयू अनभवणे, सानिका तानवडे, आदिती तानवडे, रमाकांत घाडी, रामकृष्ण जुवाटकर, माजी सरपंच विकास दीक्षित, श्रीपाद मराठे, काशीराम वारीक, दत्ताराम वारीक, विनायक चव्हाण, नारायण बाणे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.













