अंबाबाई मंदिरमार्फत गरजू रुग्णांना 25 हजाराची मदत मिळावी

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरसह महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अंबाबाई मंदिरामार्फत 25 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंबाबाई मंदिरात दिले.

याबाबतचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, दगडूशेठ गणपती ट्रस्ट, तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट यासह विविध मंदिराच्या ट्रस्ट द्वारे गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक मदत दिली जाते. त्याप्रमाणेच अंबाबाई मंदिरतर्फेही गरजू रुग्णांना कायमस्वरूपी 25 हजार रुपये वैद्यकीय मदत देण्यासाठी हे निवेदन देण्यात आले. या मदतीमुळे समाजातील गरजू रुग्णांना मोलाचा मदतीचा हातभार लागणार आहे.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!