फोंडाघाटचे अजित पाटील यांना “ज्येष्ठ रिक्षा चालक उत्कृष्ट सेवा योगदान पुरस्कार”…पंचक्रोशीत कौतुक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जी इ एम एस, ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन. सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात, फोंडाघाटचे रिक्षा चालक अजित राजाराम पाटील यांना “ज्येष्ठ रिक्षा चालक उत्कृष्ट सेवा योगदाना” बद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा गोपुरी आश्रम सभागृहात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकारी आणि पदाधिकारी यांचे हस्ते पार पडला गेला.

ते गेली २६ वर्षे वयाच्या ६४ व्या वर्षापर्यंत फोंडाघाट स्टॅंडवर, रिक्षा व्यवसाय विना अपघात करीत आहेत. गाडीची निगा राखताना, त्यांच्या विनम्र स्वभाव, सहकार्य करण्याची वृत्ती आणि मिश्किल हास्यामुळे प्रवासी वर्गात ते सुपरिचित आहेत. या सेवेचा सन्मान झाल्याबद्दल मला समजून घेतलेल्या प्रवाशांना, रिक्षा संघटनेला आणि मित्र परिवाराला, हा पुरस्कार समर्पित करीत आहे. अशी भावना यावेळी अजित पाटील यांनी व्यक्त केली. या पुरस्काराबद्दल त्यांचे पावणादेवी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे

error: Content is protected !!