श्री रामेश्वर विकास सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदरचे कृषी सहाय्यक विवेक खांडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन….!

चिंदर सोसायटीने माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे चिंदर गावांसाठी स्वतंत्र कृषी सहाय्यकाची केली होती मागणी

सोसायटीचे चेअरमन सिताराम (देवेंद्र) हडकर यांच्या हस्ते कृषी सहाय्यक विवेक खांडेकर यांचा सत्कार

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर वि.का.स सेवा सोसायटी लि. चिंदरचे ध्वजवंदन आज सोसायटी चेअरमन सिताराम (देवेंद्र) हडकर यांच्या उपस्थितीत चिंदर येथील कृषी सहाय्यक विवेक खांडेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. जुलै २०२३ मध्ये चिंदर गावासाठी महसुली गावे व लोकवस्ती तसेच शेतकऱ्यांची होणारी परवड लक्षात घेऊन गावांसाठी स्वतंत्र कृषी सहाय्यक मिळावा अशी श्री रामेश्वर वि.का.स सेवा सोसायटी लि. चिंदरच्यावतीने चेअरमन सिताराम (देवेंद्र) हडकर, माजी सोसायटी चेअरमन तथा भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीला यश मिळत, चिंदर गावांसाठी विवेक खांडेकर कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटी चेअरमन सिताराम (देवेंद्र) हडकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच तत्कालीन पालकमंत्री तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचेही आभार मानण्यात आले. यावेळी सोसायटी संचालक दिगंबर जाधव, विवेक परब, उपसरपंच दिपक सुर्वे, सचिव कविंद्र माळगांवकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, सेल्समन अक्षय साटम, भटवाडी पोलिस मंगेश नाटेकर, गुरुनाथ जावकर, सुनिल धुमडे, निशिगंधा वझे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!