वायंगणी तलाठी कार्यालया संदर्भातील वायंगणी ग्रामस्थांचे २६ जानेवारीचे जाहीर केलेले उपोषण स्थगित…..!

आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांनी वायंगणी गावासाठी स्वतंत्र तलाठी, तलाठी कार्यालय इमारत दुरुस्ती व विद्युत पुरवठा या सुविधांसाठी दि,२६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याची नोटीस मालवण तहसिलदार यांना देण्यात आली होती त्यासंदर्भात तहसीलदार यांनी दोन दिवसांत सरपंच, ग्रामस्थ, आपण स्वतः व सर्कल यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करु व निर्णय घेवू त्यामुळे तुम्ही उपोषण करु नये अशि विनंती केल्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

आज सरपंच रुपेश पाटकर, माजी सरपंच हनुमंत प्रभू ग्रामस्थ अमित खोत, रावजी सावंत यांनी तहसिलदार यांची भेट घेऊन चर्चा केली. आजची चर्चा सकारात्मक झाली असल्याने आजचे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे सरपंच रुपेश पाटकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!