आंबडोस गावाच्या श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव २८ जानेवारी रोजी

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबडोस गावाच्या श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार २८ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता कौल घेणे नंतर दुपारी देवीला नैवेद्य दाखविणे. सायंकाळी ७ वाजता सामूहिक नामस्मरण करणे. रात्री १० वाजता मांडाची पूजा, देवीचा संचार आणि दिवटी पेटविणे नंतर ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. याच दरम्यान देवीचा महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर देवीचे गोंधळी कथा कथन करणार आहेत. पहाटे काकड आरती करून या गोंधळ कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ मानकरी समिती आंबडोस आणि परब बंधू यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!