कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष यांची निवड ज्येष्ठ रिक्षा चालकांच्या सत्कार समारंभाच्या वेळी मोटर वाहन निरीक्षक सचिन पोलादे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. मंगेश सावंत यांची निवड महासंघाचे अध्यक्ष प्रणव दादा पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व सहसचिव सुधीर पराडकर यांनी मंगेश सावंत यांची निवड जाहीर केली. नियुक्ती पत्रामध्ये कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुका अध्यक्ष म्हणून सर्व रिक्षा टॅक्सी संघटना पदाधिकारी यांच्याशी समन्वय व संपर्कात राहाल अशी अपेक्षा व्यक्त केली.आपले सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठे योगदान अनेक वर्षापासून संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव, जनसंपर्क, प्रशासकीय अभ्यास, याचा रिक्षा टॅक्सी चालकांचे समस्या अडीअडचणी, न्याय मागण्या, प्रश्न सोडवून न्याय द्याल. तसेच कोकण विभागातील जुना व कोकण विभागातील नामांकित रिक्षा टॅक्सी संघटना समन्वय व संघटन अराजकीय महासंघाचे नाव आपल्या कार्यकर्तृत्वाने उज्वल कराल, अशी अपेक्षा व खात्री व्यक्त करतो. आपणास कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या पुढील कार्य व वाटचालीस सस्नेह हार्दिक शुभेच्छा. नियुक्तीपत्र देतेवेळी उपस्थित सचिन हुंदळकर पोलीस निरीक्षक विशेष शाखा सिंधुदुर्ग, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जेम्स महाराष्ट्र या संस्थेचे अमित पवार, संजय पन्हाळकर, आनंद चौगुले ज्येष्ठ रिक्षा चालक मामा ओरसकर व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक मालक उपस्थित होते. सर्व थरातून अभिनंदनचा वर्षा होत आहे.
कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश काशिनाथ सावंत यांची निवड












