चौके (अमोल गोसावी) : “भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थी सक्षम असला पाहिजे. राज्यातील व देशातील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असे अधिकारी तयार होतात. यासाठी अश्या परीक्षांची गरज असून विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत महत्वाची असून विद्यार्थ्यांचे हे यश प्रशंसनीय आहे तसेच यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी केलेले कार्य ही मोलाचे असून असाच प्रयत्न चालू ठेवून विद्यार्थ्यांचा विकास साधावा असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरव चिन्ह (पदक) देऊन गौरविताना काढले.
यावेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टा या केंद्रावर झालेल्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षां 2024-25 च्याविशेष गुणवंत विद्यार्थी कु. हर्षदा किसन हडलगेकर (सुवर्ण पदक), कु.मयुरीका अमित मांजरेकर (रौप्य पदक), कुमार भिवा रमाकांत गावडे (कास्य पदक) यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यांचा कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर व सचिव विजयश्री देसाई यांच्या हस्ते तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या केंद्रावर एकूण 108 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे समाजशास्त्र प्रमुख एकनाथ श्रीधर राऊळ तसेच ज्योती नंदकिशोर मालवदे, समीर अशोक चांदरकर. बाळकृष्ण मल्लाप्पा वाजंत्री, समीक्षा राजेश दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेच्या यशस्वितेसाठी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीस कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, विश्वस्त ॲड. एस एस पवार, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सूनीलजी नाईक, सचिव विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, स्कूल व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालक शिवराम गुराम, श्रुती वराडकर, सुप्रिया वराडकर, स्वाती वराडकर, महेश वाईरकर, मार्गदर्शक डॉ.विश्वनाथ वराडकर, सुहास वराडकर, प्रभाकर वाईरकर, नारायण पेणकर, व्हिक्टर डॉन्टस, संतोष साटविलकर यांनी भावी वाट वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












