मोटर सायकल चोरणारी दोन बालके हातकणंगले येथे ताब्यात

दोन बुलेट व दोन स्प्लेंडर मोटर सायकल असा एकूण 3,40,000 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई

काेल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक,महेंद्र पंडित (कोल्हापूर) यांनी जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणन्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या.

काेल्हापूर चे पाेलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक,रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, दोन अल्पवयीन मुलानी बुलेट गाडी चोरली असून ते सदर गुन्ह्यातील चोरलेली बुलेट मोटर सायकल घेवून 4.फेब्रुवारी रोजी कोल्हापुर सांगली रोडवरील हातकणंगले तालुक्यातील आतिग्रे गावच्या हद्दीतील अॅक्सेल हॉटेल जवळ येणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने सापळा लावून दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना त्यांचे कब्जातील नंबर प्लेट नसलेल्या बुलेट मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली बुलेट मोटर सायकल त्यानी त्यांचा साथीदार स्वप्निल सुनिल नलावडे वय-19, रा. शाहुनगर, हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर याचे मदतीने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर सखोल तपास करुन त्यांनी चोरलेली आणखीन एक बुलेट व दोन स्प्लेंडर अशा 3 मोटर सायकली जप्त करुन त्यांचा साथीदार स्वप्निल सुनिल नलावडे वय-19, रा. शाहुनगर, हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर यास देखील ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार, प्रशांत काबंळे, महेश खोत, महेश पाटील, विशाल चौगले, प्रदीप पाटील, लखन पाटील, सागर माने, शुभम संकपाळ, संदिप बेद्रे, विजय ईंगळे, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर यांनी केली

error: Content is protected !!