कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन कलेची फार मोठी परंपरा असून जिल्ह्यामध्ये अनेक भजन रसिक व कलाकार आहेत. सदर कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या व भजन परंपरा जोपासण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली येथे भजन सदन मंजूर करावे अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.
पालकमंत्री नितेश राणेंची कणकवलीत भजन सदन मंजुरीची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांकडे मागणी












