कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी 100 ऐवजी 200 इष्टांक द्यावा

पालकमंत्री नितेश राणेंची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाने राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य व कलाकार मानधन सन्मान योजना यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये केवळ १०० इष्टांक इतकेच असून त्यानांच फक्त या योजनेचा फायदा मिळत आहे. सदर योजनेअंतर्गत २०० व त्यापेक्षा जास्त इष्टांक क्षमता वाढविणे आवश्यक असल्याची मागणी राज्याचे मस्त्याेद्याेग मंत्री तथा पालंकमंत्री नितेश यांनी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. जेणेकरुन जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यीक व कलाकारांना याचा फायदा होईल.

error: Content is protected !!