वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ ते नाधवडे दरम्यान रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी तळेरे,गगनबावडा कोल्हापूर या महामार्गाचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. वैभववाडी तालुक्यातील एडगाव, करूळ,जामदारवाडी, कोकिसरे नारकरवाडी नाधवडे या गावातील शेतकऱ्यांकडून भूसंपादनासंबंधात बरेच प्रश्न समोर आले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कातकर यांनी केले आहे.
करूळ – नाधवडे रस्ता भूसंपादन बाबत ७ फेब्रुवारी रोजी प्रांताधिकाऱ्यांनी बोलावली महत्वाची बैठक












