आ.नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची असणार प्रमुख उपस्थिती
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघाची शिवसेना आणि भाजपाची संयुक्त पत्रकार परिषद उद्या 29 मार्च रोजी दुपारी 1 वाजता प्रहार भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. आमदार नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना भाजपा युतीची कणकवली विधानसभा मतदारसंघातील ही पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद होणार असून आ.नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झालेले संजय आग्रे हे प्रथमच संयुक्त पणे पत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहेत.












