अखेर ओझरम बौद्धवाडीतील नवीन नळपाणी योजनेचा शुभारंभ

उपसरपंच प्रशांत राणे यांच्या हस्ते उद्घाटन

महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती

कणकवली (स्वप्निल तांबे) : गेली कित्तेक महिने रखडलेला ओझरम बौद्धवाडीतील नवीन नळ कनेक्शनचा शुभारंभ आज उपसरपंच प्रशांत राणे यांच्या हस्ते पार पडला. चार वाड्यामध्ये घरांची संख्या वाढल्याने तसेच लोकसंख्येचे प्रमाण जास्त झाल्याने चार गावांमध्ये होणारा पाण्याचा पुरवठा अपुऱ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे ओझरम बौध्दवाडीतील ग्रामस्थांनी स्वतंत्र पाईप लाईनची मागणी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कणकवली यांच्याकडे केली होती. बौद्धवाडी येथे स्वतंत्र सार्वजनिक विहीर असून त्या विहिरीला बारमाही पाणी असते. त्यामुळे या विहिरीवर पंप बसवून वेगळे पाणी सोडण्यात यावे जेणेकरून वाडीवार वाढत्या घरांमुळे पाण्याची कमतरता भासणार नाही. या प्रस्तावाला ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कणकवली यांच्याकडून 2018 -2019 मध्ये मंजुरी देण्यात आली. त्या निधीतून बौद्धवाडीसाठी स्वतंत्र 5000 लिटर पाण्याची टाकी आणि 2 पंप सार्वजनिक विहिरीला बसवण्यात आले. या कामाचा शुभारंभ आज 28 मार्च रोजी फित कापून आणि पंपाचे बटन दाबून करण्यात आला. यावेळी उपसरपंच प्रशांत राणे, सदस्य सुधाकर राणे, सदस्य दिलीप तांबे, गावचे पोलीस पाटील तुषार तांबे आणि बौध्दवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!