सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांची

खारेपाटण नगर वाचनालयास सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ सिंधुदुर्ग व विभाग ग्रंथालय संघ आणि राज्य ग्रंथालय संघाचे तसेच कणकवली तालुक्यातील ग्रंथालयाचे प्रतिनिधी यांनी नुकतीच खारेपाटण येथील नगर वाचनालयास गुरवारी सकाळी १०.०० वाजता सदिच्छा भेट दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसळे, कार्यवाह राजन पांचाळ, कार्यकारणी सदस्य सतीश गावडे, गुरुनाथ मडबन कणकवली नगर वाचनालयाचे ग्रंथपाल राजन ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण नगर वाचनालयाचे विश्वास संतोष पाटणकर यांनी उपस्थित जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. आणि खारेपाटण नगर वाचनालयाच्या कामकाजा विषयी माहिती दिली. तर खारेपाटण नगर वाचनालयाचे ग्रंथपाल महेश सकपाळ यांनी ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तक साठा व वाचक संख्या आणि ग्रंथालयीन कामकाज करताना येणाऱ्या समस्या व अडचणी विषयी विस्तृत चर्चा केली.
यावेळी जील्हा ग्रंथालय संघ वाचनालयाच्या पदाधिकार्यांनी ग्रंथालयीन कर्मचारी यांना सखोल मार्गदर्शन केले. व ग्रंथालयाची माहिती व समस्या जाणून घेऊन कमकाजविषयी काही सूचना केल्या. यावेळी नगर वाचनालय खारेपाटणचे ग्रंतपल महेश सकपाळ, लिपिक रिया जाधव, शिपाई – बाबू लाड आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!