फोंडाघाट मधील युवती बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट गांगोवाडी येथील लतिका नागेश चव्हाण (२१) फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वानऊ वाजता फोंडा घाट कॉलेजमध्ये प्रोजेक्ट देण्यासाठी जाते असे सांगून घरातील बाहेर पडली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत लतिका ही घरी आली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे तिची आई नम्रता चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाणे लतिका ही बेपत्ता असल्याची खबर दिली आहे. लतिकांनी घरातील बाहेर पडताना अंगात मोरपिशी रंगाच्या आप टी-शर्ट काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट सोबत पिवळी सॅक आहे. तसेच तिची उंची सुमारे पाच फूट असून रंग गोरा आहे. तरी अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!