लाचखोरी च्या गुन्ह्यातील उपनिबंधक सांगळे, अधीक्षक यादव ची जामिनावर मुक्तता

ओरोस (प्रतिनिधी) : ३३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी तक्रारदार यांचे श्री. स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, ता. मालवण या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करुन जमीन संस्थेच्या नावे करणेकरिता ५० हजार रुपये रकमेच्या लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार १० जानेवारी २०२५ रोजी प्राप्त झाली होती. १६ जानेवारी २०२५ रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेविका उर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये ४० हजार रुपये लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील ३३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती.

४ फेब्रुवारी मध्यरात्री नंतर जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांच्यावर गुन्हा दाखल करीत अटॅक करण्यात आली होती. ५ रोजी त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले होते. प्रथम पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी दोघानाही सुनावण्यात आली होती. त्यानंतर या दोघांनीही जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर १० फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती. आज त्यावर निर्णय देण्यात आला. यावेळी या दोघानाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

लाच घेतल्याच्या गुन्ह्याझाली अटक असलेल्या जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी दोन्ही संशयितांनी गुन्ह्याच्या कामी असलेल्या सरकारी साक्षीदारास आमीष दाखवणे, धमकाविणे किंवा वचन देऊन त्यास फितूर करणे असे कृत्य करु नये. आरोपींनी त्यांच्यावर आरोप असलेला गुन्हा पुन्हा करु नये. आपला स्वतःचा व दोन नातेवाईकांचा रहाण्याचा पत्ता व फोन नंबर तपासी अंमलदारास सादर करावा. आरोपींनी चार्जशीट दाखल होईपर्यंत आपली कोणतीही मिळकत तबदिल करु नये या अटींवर प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला. संशयित आरोपीतर्फे अॅड. अजित भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. मिहीर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!