सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी महाकुंभमेळ्यात केले महाकुंभस्नान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे मूळ रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक संदीप चौकेकर यांनी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात सहभागी होत पवित्र महाकुंभस्नान केले. प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात केवळ भारतातूनच नाही तर विदेशातूनही भाविक महाकुंभस्नान पर्वणी चा अतिदुर्मिळ लाभ घेण्यासाठी येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनीही प्रयागराज येथे जात महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन गंगास्नान करत महाकुंभस्नानाच्या पर्वणीचा लाभ घेत शिवशंकाराची मनोभावे पूजा अर्चा केली.

error: Content is protected !!