कणकवली शहरातील सुतारवाडी व माईन सुतारवाडी येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. कणकवली शहरातील सुतारवाडी व माईन सुतारवाडी येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी संपन्न झाली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विश्वकर्मा जयंतीला उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी सुतारवाडी मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, युवासेना कणकवली तालुका समन्व्यक तेजस राणे, प्रतीक मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, अक्षय मेस्त्री, नितीन पांचाळ, कल्पेश मेस्त्री, अनंत मेस्त्री, सुभाष मेस्त्री, हर्षद मेस्त्री, जीजी मेस्त्री, महादेव मेस्त्री, अरुण मेस्त्री, दीपक मेस्त्री,काशीराम मेस्त्री,विश्वनाथ पाडावे, गजानन मेस्त्री, विजय मेस्त्री, सुभाष मेस्त्री, शांताराम मेस्त्री, किशोर मेस्त्री आदी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!