मालवण पॉलिटेक्निकच्या ९० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट!

मसुरे (प्रतिनिधी) : गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, मालवणने यंदाच्या प्लेसमेंट सत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या प्लेसमेंट डेटानुसार, महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य प्रकाश शिरहट्टी यांनी दिली.औद्योगिक क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केली असून, हे संस्थेसाठी अभिमानास्पद यश आहे.पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल-१६, इलेक्ट्रोनिक्स २७ तर मेकॅनिकलच्या २३ विद्यार्थ्यांची निवड केली. जीई एरोस्पेस पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या १० तर इलेक्ट्रिकलच्या ०८ विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच Proarc Welding & Cutting Systems या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल-०२ आणि इलेक्ट्रोनिक्सच्या०४ विद्यार्थ्यांची निवड झाली. सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन & टुब्रो मुंबई, IFB ह्या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एस. शिरहट्टी आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारीआर. बी. बोर्डे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमासोबतच महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे. संस्थेच्या या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे.

या प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये करिअर घडवण्याची संधी मिळाली आहे. बजाज ऑटो आणि GE एअरोस्पेस यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी संस्थेच्या गुणवत्तेवर विश्वास दाखवत विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आणखी चांगली संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.या निवडीसाठी संस्थेचे प्राचार्य पी. एस. शिरहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीद्वारे निवडीसाठी प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी राहुल बोर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखांचे

error: Content is protected !!