गडनदी पुलावर ट्रकची दुचाकीला जाेरदार धडक

दहा वर्षाच्या मुलासह महिला गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. यात दहा वर्षाच्या मुलासह त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. घटनेचे वृत्त समजताच कणकवलीकरांनी गडनदीपुलावर गर्दी केली असून मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला आहे. महामार्गावरील गडनदीपुलालगतच्या हळवल फाटा येथे सातत्याने अपघात होत आहेत. मात्र महामार्ग विभाग त्यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ कणकवलीकरांनी एकत्र येऊन रास्ता रोको सुरू केला आहे. यात महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

error: Content is protected !!