श्री गुरुदेव दत्त मंदिर बिडवाडी येथे ३० मार्च रोजी श्री रामनवमी उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे श्री गुरुदेव दत्त मंदिर बिडवाडी येथे गुरुवार ३० मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे, त्यानिमित्त धार्मिक कर्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

गुरुवार ३० राेजी सकाळी ७ वा.श्रींची महापुजा सकाळी ९ वा.श्री राम पंचायतन पूजा,सकाळी १० वा.ह.भ.प.शोभा मुणगेकर यांचे किर्तन,दुपारी १२.०२ वा.श्री राम जन्मोत्सव सोहळा,महाआरती, सुंठवडा व प्रसाद वाटप, दुपारी १.वा.महाप्रसाद तसेच सायंकाळी ५ वा.नंतर स्थानिक भजने आदी कार्यक्रम हाेणार आहेत.

भाविक भक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदेव दत्त मंदिर देवस्थान कमिटी बिडवाडी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!