१५ वा वीत्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक रेशनकार्ड धारकास लाभ
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायत च्या वतीने 15 वा वित्त आयोग निधीतून गावातील प्रत्येक रेशन कार्ड धारकास डस्टबीन वाटप करण्यात आले आणि सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी मोठे डस्टबीन देण्यात आले. यावेळी सरपंच मनमोहन डिचोलकर , उपसरपंच रवींद्र परब, सर्व सदस्य , ग्रामसेवक स्वाती कदम आणि लाभार्थी नागरिक उपस्थित होते. या योजनेचा गावातील २५० रेशनकार्डधारक ग्रामस्थांनी लाभ घेतला.