वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले हे गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सागरी सीमेवरील अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. सागर सुरक्षा ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. त्यामुळेच वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या वतीने सागर रक्षक दलातील स्वयंसेवी रक्षकांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या उपस्थितीत टी शर्ट व कॅप चे वाटप करण्यात आले.सागर रक्षक दलातील सदस्य पोलिस यंत्रणेचे कान नाक आणि डोळे बनून समुद्रकिनारी लक्ष ठेवून असतात.कोणतीही अनुचित घटना घडली अथवा संशयास्पद आढळले तर तात्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधतात.पर्यटकांची जीवितहानी होऊ नये यासाठीही दक्ष असतात. त्यामुळे पोलिस दल आणि सागर रक्षक यांचे परस्परसंबंध दर्शविणारी टी शर्ट आणि कॅप चे आज वाटप करण्यात आले. या टीशर्ट आणि कॅप मुळे आम्हालाही पोलीस दलाशी कनेक्ट असल्याची ओळख मिळाल्याची भावना यावेळी सागर रक्षक दलातील सदस्यांनी व्यक्त केली.