ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याबद्दल होमगार्ड प्रसाद वळंजू विरोधात गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलिस ठाण्याअंतर्गत ड्युटीवर नियुक्त असलेला होमगार्ड प्रसाद अरुण वळंजू ( वय ३० वर्षे , रा, सांगवे केळीचीवाडी ) याच्याविरोधात ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याचे उघड झाल्यामुळे कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलमठ येथील सार्वजनिक रस्त्यावर १३ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता प्रसाद मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करताना आढळून आला होता. याबाबत ची फिर्याद हवालदार चंद्रकांत झोरे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार कलम ८५ ( १ ) ( a ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक दिगंबर घाडीगावकर करत आहेत.

error: Content is protected !!