“ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन” च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे झाले तात्काळ निरसण

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दि.८ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेवून सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नं. ७०३६६०६०६० चे लोकार्पण करण्यात आले होते. दि. १० फेब्रवारीपासून नमूद हेल्पलाईन वर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत ५ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यापैकी ४ तक्रारींचे तात्काळ प्रतिसाद देवून निरसंन करण्यात आले आहे. १ तक्रारीचे निरसंन करण्याबाबत संबंधित विभागाकडुन कार्यवाही सुरु आहे.

विश्राम दत्तात्रय ठाकुर (रा. आडेली पलतडवाडी ता. वेंगुर्ला) यांनी ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनला संपर्क साधुन माहिती दिली की, थम लागत नसल्याने गेली तिन वर्षापासुन रेशन मिळत नसल्याने मदत करा असे कळविले. दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पूजा प्रकाश परब (वय ७०,व्दारका अपार्टमेंट, कीर्ती हॉटेल जवळ, कुडाळ) यांनी मोबाईल क्र. ९८९०८७३३६८ वरुन ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनला संपर्क साधुन माहिती दिली की,आपले पती प्रकाश भास्कर परब, वय ८१ वर्ष यांची २८ वर्षापुर्वी उत्तर प्रदेशच्या मऊ शहरामध्ये क्लिीनिक लॅब होती. त्याच दरम्याने त्यांना विद्युत शॉक लागला आणि तेव्हापासुन ते आजारी आहेत व ते मागील १० वर्षापासून त्यांचे हालचाली मंदावल्या असून ते पुर्णपणे बेडवर आहेत. त्यांचे अद्यापपर्यंत आधार कार्ड काढण्यात आलेले नाही.आधार कार्ड नसल्याने त्यांना शासकीय व अन्य वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने अडचणी येत असून आम्हाला मदत करा असे कळविले.

हि माहिती पाेलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना कळविल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग) यांनी आपले पथकासह संबंधीत जेष्ठ नागरीक यांचे घरी तात्काळ जाऊन त्यांची आपुलकीने चौकशी केली व आधार कार्ड काढुन देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासीत केले. १८ वर्षावरील व्यक्तींचे आधार कार्ड काढुन देण्याची सुविधा ओरोस येथील आधार कार्ड सेवा केंद्राचे संचालक बाळ खडपकर, रा. ओरोस यांच्याकडे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना उपरोक्त ज्येष्ठ नागरिक यांचे आधार कार्ड काढून देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी तात्काळ प्रतिसाद देवून दि. १२/०२/२०२५ रोजी ऑपरेटर कु.उषा गणपत करलकर यांचे मदतीने श्री.परब यांचे बायोमॅट्रीक ठसे व आयरिश घेवुन तसेच ऑनलाईन फॉर्म भरुन आधार कार्ड काढुन देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान सदर जेष्ठ नागरीक यांचे फिंगरप्रींट व आयरिश घेण्यामध्ये खुप अडचणी येत होत्या. पोलीस पथकाने व त्यांचे कुटुंबीयांसमवेत सर्वतोपरी प्रयत्न करुन त्यांचे यशस्वीरित्या फिंगरींट व आयरिश घेतले त्यामुळे पुढील कार्यवाही करणे सुलभ झाले. तसेच श्री. विश्राम दत्तात्रय ठाकुर रा. आडेली पलतडवाडी ता. वेंगुर्ला यांचे रेशन कार्ड बाबत सपोनि. श्रीम. हिरेमठ, जेष्ठ नागरीक कक्ष, भरोसा सेल, सिंधुदुर्ग यांचे पथकाने तहसील कार्यालय, वेंगुर्ला यांचेशी संपर्क साधुन तात्काळ रेशन सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

हि कार्यवाही सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व सपोनि.श्रीम. हिरेमठ, जेष्ठ नागरीक कक्ष, भरोसा सेल, सिंधुदुर्ग यांचे पथकाने केलेली आहे.

वरील ज्येष्ठ नागरिकांच्या नातेवाईकांनी पोलीसांचे कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तरी जेष्ठ नागरीकांना आवाहन करण्यात येत की, त्यांनी आपल्या अडचणींबाबत सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नं. ७०३६६०६०६० वर तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!