खारेपाटण हायस्कूलच्या ७१ व्या एस एस सी बॅचचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या ७१ व्या एस एस सी बॅच – २०२५ चा शुभेच्छा समारंभ नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर भाई काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष भाऊ राणे,सचिव – महेश कोळसुलकर, संस्था विश्वस्त विजय देसाई,गुरुप्रसाद शिंदे,खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटण चे संचालक मंगेश गुरव,शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत तसेच शालेय विद्यार्थी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने १० वी च्या बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेछा दिल्या.तर १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील गत आठवणीना उजाळा देत.सर्व शिक्षक व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.तर या बॅच च्या वतीने शाळेला एक डिजीटल घड्याळ भेट देण्यात आले. यावेळी वर्ग शिक्षक कोकाटे मॅडम, भोर नाद, राजेश वारं यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नासीर भाई काझी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने दहावीच्या परीक्षेला सामोरे जावून गुणवत्तापूर्वक निकालाचे प्रदर्शन करून विद्यालयाचे नाव लौकीक वाढवावे असे आवाहन असे आवाहन केले. तर संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांनी देखील आपल्या विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत कोणतेही दडपण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जा अशा प्रकारचे आवाहन केले.

तर शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षकांनी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.त्याप्रमाणे तुम्ही पण चांगल्या अभ्यासाची तयारी करा.व त्याचा एकत्र मेल घालून शाळेच्या निकालाउंची वाढविन्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष राऊत सर तर सूत्रसंचालन महादेव मोटे आणि सर्वांचे आभार शाळेचे मुख्याद्यापक संजय सानप सर यांनी मानले.

error: Content is protected !!